मालवण : प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेचा विशेष कादंबरी पुरस्कार वैशाली पंडित यांच्या ‘कल्याण कटोरा’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.ही कादंबरी मालवण तालुक्यातील वायंगणी येथील दादा महाराज प्रभु या संतपुरूषांच्या जीवनावर आधारित असून वैशाली पंडित यांनी या कादंबरीत ‘जिज्ञासा’ या व्यक्तिरेखेतून दादा महाराजांचे चरित्र उलगडले आहे.ही कादंबरी कणकवलीतील श्री.विघ्नेश गोखले यांनी प्रकाशित केली आहे.दादा महाराजांच्या अनुयायांकडून तसेच मराठी वाचकांकडून ‘कल्याणकटोराचे’ उत्स्फूर्त स्वागत झाले आहे.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या या पुरस्कारामुळे चरित्र कादंबरीत वेगळा प्रयोग केल्याच्या प्रयत्नाला मराठी साहित्य रसिकांकडून शाबासकी मिळाल्याचा आनंद साहित्यिक वैशाली पंडित यांनी व्यक्त केला आहे. २०२१-२२ मधील सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांचे ,कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर,केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डाॕ.प्रदीप ढवळ,विश्वस्त प्रमुख श्री.रमेश कीर, रेखा नार्वेकर,अरूण नेरूरकर यांनी अभिनंदन केले आहे.









