कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महसूल विभागाच्या स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये चिंचवडे तर्फ कळे तालुका करवीर गावची सुकन्या कोमल उत्तम पाटील हिची महसूल सहाय्यकपदी म्हणून निवड झाली. चिंचवडे गावातील कोमल हिचे प्राथमिक शिक्षण हे गावातील सरकारी प्राथमिक शाळेतच झाले.माध्यमिक परीक्षेतील यशाने तिने सायन्स मधून पुढील शिक्षण घेतले.त्यानंतर ती श्री छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय ओरस येथे कृषी पदवी घेतल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. आणि पहिल्या फेरीतच ती यशस्वी झाली. कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करत ती महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत पास झाली. जिद्द व कष्टाने प्रयत्न केल्यास यश मिळते, हे तिने सिद्ध केले. यासाठी तिला तिचे गुरुवर्य, नातलग व विशेष करून आई-वडिलांची प्रेरणा मिळाली.कोमल पाटील हिची निवड झाल्याने तिचे संपूर्ण चिंचवडे गावामध्ये कौतुक होत आहे.
Previous Articleरेकॉर्डवरील आरोपी गावठी कट्टयासह जेरबंद
Next Article फळांच्या राजाचे कराडला आगमन








