म्हापसा : कोलवाळ पंचायतीच्या सरपंचपदी दशरथ (परेश) बिचोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच शीतल चोडणकर यांनी करारानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर हे पद रिक्त झाले होते. त्या पदासाठी बिचोलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निर्वाचन अधिकाऱ्यांनी बिचोलकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून दशरथ बिचोलकर यांचे नाव घोषित केले. या पंचायतीवर माजी आमदार किरण कांदोळकर यांचे वर्चस्व असून कांदोळकर यांनी सरपंच =दशरथ बिचोलकर यांना पुष्पहार घालून अभिनंदन केले. 9 पंच सदस्य असलेल्या कोलवाळ पंचायतीमध्ये आज सरपंच निवडवेळी उपसरपंच गीता चोडणकर, मावळत्या सरपंच शीतल चोडणकर, पंच लिब्रेटा फर्नांडिस, सुप्रिया कांदोळकर, रती (रितेश) वारखंडकर, प्रियंका बिचोलकर उपस्थित होत्या. पंच हनुमन हळर्णकर व नारायण बिचोलकर हे अनुपस्थित होते. सचिव प्रेमानंद मांद्रेकर यांनी निवडणूक प्रक्रियेत सहाय्य केले. सरपंच दशरथ बिचोलकर म्हणाले, ही आपली दुसरी वेळ आहे. भंगार अ•ा समस्या न्यायालयात आहे पण कचरा समस्या मोठी आहे शिवाय 4 विकासकामाच्या फाईल्स आहे ते आम्ही पूर्ण केल्या. भंगार अड्ड्यांवर आम्ही कडक कारवाई केली, 2 अ•s यापूर्वी पंचायतीने जमिनदोस्त केले. परंतु भंगार अ•dयांचे मालक न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवितात यामुळे पाच वर्षे अशीच जातात. ही पंचायत घडवून आणण्यास नितीन यांनी पुढाकार घेतला आहे. आम्ही सर्व मिळून चांगल्यारित्या पंचायत चालविणार. कुणालाही हात दाखविण्यास आम्ही देणार नाही, असे बिचोलकर म्हणाले. मावळत्या सरपंच शीतल चोडणकर यांनी नवनिर्वाचित सरपंच दशरथ बिचोलकर यांना शुभेच्छा देत आम्ही सदैव गावच्या विकासासाठी सहकार्य करणार असे म्हणाल्या.
भंगार अ•sमुक्त कोलवाळ करण्याकडे भर : किरण कांदोळकर
दशरथ बिचोलकर हे यापूर्वी सरपंच होते तेव्हा त्यांनी गावात चांगले काम केले आहे. कामुर्ली ते कोलवाळ दरम्यान पथदीप घातले. थिवीतील रस्त्यांवर रात्रीच्यावेळी काळोख असायचा तेथे पथदीप घातले. कोलवाळ पंचायतीकडे पुरेसा फंड असून विकासासाठी सरकारावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कोलवाळमधील भंगार अ•s हटविण्यास पंचायतीने सहकार्य केले असून कोलवाळ भंगार अ•sमुक्त करण्यासाठी आम्ही कोलवाळ मिशन राबिवण्यावर भर देणार असल्याचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सांगितले.









