ऐतिहासिक पन्हाळा गडावर काल प्रेमी युगलांनी खोल दरीत उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केल्यानंतर जिल्हा पोलीस आणि निर्भया पथक यांच्यावतीने पन्हाळा गडावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनेक प्रेमी य़ुगुलांना ताब्यात घेण्यात येऊन चौकशी करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक पन्हाऴा गडावर काल फिरायला आलेल्या प्रेमी युगुलांनी खोल दरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गडावर फिरायला येणाऱ्या प्रेमी युगुलांची चौकशी करण्यात यावी अशा भावना गडावर लोकांनी व्यक्त केल्या होत्या.
या पार्श्वभुमीवर आज जिल्हा पोलीस आणि निर्भया पथक यांच्याकडून गडावर फिरायला येणाऱ्या प्रेमी युगुलांची चौकशी करण्यात आली. निर्भया पथकाने पन्हाळा गडावर धडक कारवाई करत दुचाकी आणि चारचाकीतून येणाऱ्य़ा जोडप्यांची चौकशी केली. या कारवाईत पोलिसांनी आणि निर्भया पथकाकडून अनेक प्रेमुयुगलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच घरात न सागंता फिरायला आलेल्या प्रेमी युगलांचीही पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. यापुढे पन्हाळा गडावर फिरायला या ,पण घरातून परवानगी घेवूनच या! असा सज्जड इशारा पोलिसांनी प्रेमी युगुलांना दिला आहे.









