मालवण / प्रतिनिधी
दारु पिऊन सुसाट वेगाने ट्रीपल सीट दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या कोल्हापूर येथील युवकांची नशा मालवण पोलिसांनी चांगलीच उतरवली. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.भरड नाक्यावर बंदोबस्तात असलेल्या गुरुदास परब यांनी ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या युवकाला थांबण्यासाठी शिटी वाजविली. सदरच्या युवकांनी गाडी न थांबवता पुढे तारकर्ली मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस कर्मचारी भोसले यांनी त्या युवकांना थांबविण्यासाठी प्रयत्न केला. पण, त्या युवकांनी त्यांना धडक देत पुढे पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्रीकृष्ण भोसले यांनी एकाला पकडले तर दोघे जण पळून गेले. पोलिसांनी पकडलेल्या युवकाला पकडून पोलिस ठाण्यात आणून चांगलीच हजेरी घेतली. सिनेस्टाईल घटनेमुळे शहरात घटनेची चर्चा सुरू झाली होती. पोलीस कर्मचारी भोसले यांच्या कामगिरी बद्दल कौतुक होत आहे.









