प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या दर्जेदार खाद्यपदार्थांच्या माध्यमातून बेळगावकरांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श पॅलेसमध्ये आता कोल्हापुरी फूड फेस्टीव्हल सुरू झाला आहे. या माध्यमातून खवय्यांसाठी अस्सल कोल्हापुरी चवीचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अस्सल कोल्हापुरी चवीच्या पदार्थांची रेलचेल या ठिकाणी असणार आहे. ग्राहकांना येथे झणझणीत व रुचकर खाद्यपदार्थांची पर्वणी लाभणार आहे. या माध्यमातून आदर्श पॅलेस, उडान बार अँड रेस्टॉरंटमध्ये कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा आणि पांढरा रस्सा, मांसाहारी पद्धतीचे जेवण उपलब्ध होणार आहे. 26 मार्चपर्यंत हा फूड फेस्टीव्हल सुरू राहणार असून ग्राहकांनी त्याचा आस्वाद घेण्यासाठी आदर्श पॅलेसला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









