स्थानिक व्यावसायिकांनी याचा फायदा घेण्याची गरज आहे
By : विद्याधर पिंपळे
कोल्हापूर : काही वर्षांपूर्वी पायात चप्पल असलेल्या लोकांना, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोखले जात होते. पण आता कोल्हापुरी चप्पलने महत्वाचे स्थान मिळवले आहे. यामुळे इटलीच्या प्राडा कंपनीला आता कोल्हापूर फेऱ्या माराव्या लागत आहेत. स्थानिक व्यावसायिकांनी याचा फायदा घेण्याची गरज आहे.
आता कोल्हापुरी चप्पल हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, प्राडा कंपनीला आता कोल्हापूरच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत. कोल्हापुरी चप्पलच्या व्यवसायासाठी पुढील चर्चेसाठी लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे.
कोल्हापूरी चप्पल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले असून, आता याचा फायदा व्यावसायिकांनी घेण्याची गरज आहे. 12 व्या शतकातील हस्तकला म्हणून कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरवासियांचा पारंपारिक वारसा मानला जातो. 2019 मध्ये महाराष्ट्र व कर्नाटक येथील आठ गावांतील कोल्हापुरी चप्पलला भौगौलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.
कोणताही कायदेशीर आधार नसताना, इटलीच्या लक्झरी फॅशन पॉवरहाऊस प्राडाने, भारतीय संस्कृतीची चोरी करून, फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल झळकावून याची किंमत लाखाच्या पुढे जाहीर केली. प्राडाने कोणतीच चर्चा वा मान्यता नसल्याने, याबाबत देशभरात नव्हे जगभरात प्राडाची नाचक्की झाली.
यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रिज अॅन्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललीत गांधी व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्राडाशी पत्रव्यवहार करून, त्यांचे पितळ उघडे केले. याची दखल घेऊन, तात्काळ कोल्हापुरात आलेल्या प्राडाच्या बिझनेस टीमने याची माहिती घेतली.
कोल्हापुरी चप्पलचे डुप्लीकेट करणे हे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा अहवाल कंपनीला देणार असून, नंतरच पुढील दिशा ठरणार आहे. तत्पूर्वी प्राडा कंपनीला कातडी खरेदी, कारागिरांना शिक्षण,मशिनरी, जागा, कोल्हापुरी चप्पलची खरेदी–विक्री, प्रदूषण कायदे, कारागिरांची मान्यता आदींचा विचार करूनच जागतिक व्यापारी नियमानुसार चर्चां करावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापुरी चप्पलची विक्री करावयाची असेल तर कोल्हापुरातच त्यांना वारंवार यावे लागणार आहे.
चप्पलच्या डिझायनची सुध्दा चोरी
प्राडाने कोणताच कायदेशीर आधार न घेता, फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पल उतरवले होते. असाच प्रकार पेशावरी चप्पलबाबत झाला होता. ब्रिटीश डिझायनर पॉल स्मिथ यांने ,पाकिस्तानात बनवलेल्या पेशावरी चप्पलसारखे दिसणारे सँडल बाजारात आणले होते. याचा दर 595 डॉलर असा होता. त्या कंपनीने त्यांच्या वेबसाईवर सँडलचे वर्णन बदलून, पेशावरी चप्पलपासून प्रेरित केले असल्याचा उल्ले ख केला होता. पण प्राडाने तसा कोणताच उल्लेख केलेला नसल्याने, त्यांना माफी मागावी लागली आहे.








