कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. राजेश गायकवाड यांची नियुक्ती झाली. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने गायकवाड यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. गायकवाड सध्या सातारा येथे सहायक संचालक (कुष्ठरोग विभाग) या पदावर कार्यरत आहेत.
आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची जुलै महिन्यात बदली झाल्यानंतर कोल्हापुरातील पद रिक्त होते. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. संजय रणवीर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. साळे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर डॉ. गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव व. पां. गायकवाड यांच्या सहीने बदलीचा आदेश निघाला आहे. डॉ. गायकवाड हे राजपत्रित अधिकाऱ्यांचे संघटनेचे पदाधिकारी आहेत.