कोल्हापूर प्रतिनिधी
भाजीपाला फुले, फळे काढणीनंतर फळांमध्ये रासायनिक क्रिया होत असतात व पिकवलेला माल लवकर सडून किंवा कुजून जातो. अशा पिकवलेल्या मालाला शीतगृहाची अवश्यकता भासते. शेतक्रयांना कोल्ड स्टोरेज अर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. याचा विचार करून त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर अधारीत शीतकक्षाची उभारणी करण्याचे प्रात्यक्षिक कृषीकन्यांकडून नुकतेच दाखविण्यात आले.
इस्पुर्ली (ता. करवीर)येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे (ता. हातकणंगले) यांच्या माध्यमातून ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यनुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात सहभागी विद्यार्थीनी म्हणजेच कृषीकन्या श्रृतिका टिपुगडे, श्रेया सातपुते, अंतरा थोरात, उत्कर्षा शेडगे, पल्लवी हांडे, श्रद्धा पाणदारे यांनी शुन्य कर्जेवर आधारीत शीतगृह कक्षाची उभारणी कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्राचार्य डी. एन. शेलार, प्रो.एस.एम. घोलपे, प्रो. यु. वी. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक करण्यात आले.
अनेक गावांना वीजपुरवठा वेळेवर होत नाही. होत असला तरी त्यात सातत्य राहतेच असे नाही. त्यामुळे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात अडचणी येत आहे. परिणामी अनेक शेतक्रयांना शेतात पिकवलेला भाजीपाला, फुले, फळे जास्त दिवस ठेवता येत नाही. यातून शेतीमाल कुजल्याने तो फेकून द्यावा लागतो. यासाठी शेतकर्यांना कमी खर्चात व सहज उपलब्ध होण्राया वस्तूंचा वापर केला जाऊन शीतगृह कसे तयार करायचे याची माहिती कृषीकन्यांनी शेतक्रयांना दिली. तसेच खड्डा खणणे व भरणी याचे मार्गदर्शनही कृषीकन्यांनी शेतकर्यांना केले. यावेळी प्रगतशिल शेतकरी अक्षय पोवार, सुरेश पोवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









