गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथील आर्यन शेलमोन धनवडे ( वय 16 ) सध्या रा. सिद्धार्थ नगर गोकुळ शिरगाव, मुळगाव कुरळप ता. वाळवा जि. सांगली) या युवकाने रविवारी रात्री राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी सकाळी दरवाजा उघडल्यानंतर ही माहिती समोर आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आर्यनच्या मागे त्याला एक मोठा भाऊ व वडील आहेत. सदर घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सोमवारी उशिरा करण्यात आली . अधिक तपास सहायक फौजदार शेख करीत आहेत.









