शिरोळ : प्रतिनिधी
तीन महिन्यापुर्वी लमान वसाहत नांदणी नाका धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी तरुणास शिरोळ पोलिसांनी अटक केली. अजित रमेश जाधव (वय २७, रा. लक्ष्मीनगर, धरणगुत्ती) असे संशयीत आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
संशयीत आरोपी जाधव याने सुरज अरुण कलकुटी यांच्या घराचा दरवाजा बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला. मोबाईल संच व सोन्याचे दागिने असा २३ हजार ६०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला होता. पोलिसांनी तपासयंत्रणा राबवून संशयीताला अटक केली. त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरीत मुद्देमाल जप्त करण्यासाठी संशयीतास कोठडी मिळावी, असा युक्तीवाद सरकारी वकील सुर्यकांत मिरजे यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.