देशात कोल्हापूर विभागाची नेत्रदिपक कामगिरी साताऱ्याच्या यश शिंदेला सुवर्णपदक; यश शिंदेसह, अनुष्का कांबळे, यश चौगुले, साधना भिलवडे यांचे यश
कोल्हापूर प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय इन्स्पायर ऍवार्ड मानक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या इन्स्पायर अवॉर्डमध्ये कोल्हापूर विभागाने नेत्रदिपक कामगिरी केली आहे. कोल्हापूर विभागातील सातारच्या यश शिंदे याने सुवर्णपदक पटकावले आहे. तर टॉप साठमध्ये अनुष्का कांबळे, यश चौगुले, साधना भिलवडे यांनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशभरातून 3 लाख 53 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी शिक्षण विभागाडून अभिनंदन केले.
नवी दिल्ली येथे इन्स्पायर अवॉर्ड मानक प्रदर्शनात देशभरातून 3 लाख 53 हजार तर महाराष्ट्रातून 31 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी राज्यातील 9 विद्यार्थ्यांची टॉप 60 मध्ये निवड झाली असून कोल्हापूर 2 सांगली 1 आणि साताऱयाचा 1 विद्यार्थ्याचा समावेश आहे. 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान पार पडला. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, विभागाचे सेक्रेटरी डॉ. श्रीवर चंद्रशेखर, राष्रीर प्रवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पी. एस. गोयल, डॉ. बिपिन कुमार, अवॉर्डच्या प्रमुख नमिता गुप्ता यांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा पार पडला. सातारा जिल्हय़ातील वाई तालुक्यातील परखंदी हायस्कूलच्या यश शिंदे याच्या ‘मल्टिपरपज केटरींग इक्विपमेंक मशिन’ या संशोधनाला सुवर्णपदक मिळाले आहे. तर कोल्हापुरातील करवीर तालुक्तायील हसुर हायस्कूलच्या अनुष्का कांबळेच्या ‘शुगरकेन लिप्टर’, कुडीत्रेतील डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजच्या यश चौगुलेच्या ‘खारीक बी. अलगीकरण’, तर मिरज येथील समडोळी हायस्कूलच्या साधना भिलवडेच्या ‘सुरक्षित बैलगाडी’ वरील संशोधनाचा टॉप 60 मध्ये समावेश झाला आहे. डायटचे अधिव्याख्याता रमेश कोरे यांनी शाळानिहाय घेतलेल्या कार्यशाळांचा फायदा कोल्हापूर विभागाला झाला आहे. जिल्हास्तरीय कार्यशाळा शिक्षण उपसंचालक महेश चोथे आणि डायटचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांच्या मार्गदर्शनाखली घेतली होती. या यशाबद्दल शिक्षकांकडून अभिनंदन होत आहे.
प्रत्येक शाळंनी पाच कल्पनांची नोंदणी करावी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचारांची संस्कृती विकसित करण्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. भविष्यात हे यश कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रत्येक शाळेतून 5 कल्पनांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
महेश चोथे (शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर)