Kolhapur Weather Update : गेल्या आठवडाभरापासून राज्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात संसतधार पाऊस सुरु आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुढील 3 दिवस कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4 ते 7 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जिल्ह्यात धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्या दुधडी वाहू लागल्या आहेत. राधानगरी धरण क्षेत्रातही पाऊसाचा जोर कायम आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यंदा पहिल्यांदाच रुई बंदरा पाण्याखाली गेला आहे.