Kolhapur : कोल्हापुर शहरात गेल्या अनेक दिवसापासून पाणीटंचाईची समस्या येत आहे. शहराला अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. आधीच कडक उन्हाळा त्यात पाणीटंचाई यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते पाण्यावरून आक्रमक झाले आहेत. शहरात मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूर महापालिकेवर घागर मोर्चा काढला. महापालिका गेटसमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा काळे फासू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Previous Articleभूमिगत वीज वाहिन्या योजनेमुळे फोंड्यातील प्रवाह सुधारणार
Next Article आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काजू फेणी निर्मिती









