कोल्हापूर, प्रतिनिधी
शिंगणापूर जल उपसा योजनेवरील 1100 मी. मी. मुख्य पाईपलाईनची गळती काढण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. या केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी, व ई वॉर्ड सहीत उपनगरातील काही भागामध्ये आज, सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच उद्या, मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरीकांनी पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.









