कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील महे- कसबा बीड दरम्यानच असलेल्या पुलावर पाणी आल्याने आज वाहतूक बंद झाली आहे. काल रात्रीपासून राधानगरी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे ही वाढ झाली आहे.
महे -कसबा बीड येथील तुळशी- भोगावती संगमावर असलेल्या पुलावर मध्यरात्री 12.00 पाणी आले आहे. गेल्या चार दिवसापासून राधानगरी धरणक्षेत्राबरोबरच करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या मुसळधार पाऊस चालु आहे. त्यामुऴे लहान ओघळ, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या सगळ्यांचा विसर्ग तुळशी आणि भोगावती नद्यांमध्ये आहे. त्यामुळे करवीरच्या पश्चिम भागात प्रमुख नद्या असणाऱ्या तुळशी- भोगावती नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सतत वाढ होत आहे.
अधिक वाचा- कोगे-कुडित्रे दरम्यान वाहतूक बंद; पुलावर अडकला मृत गवा रेडा
कोल्हापूरला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावर कोगे, महे, कसबा बीड, सावरवाडी, शिरोली दुमाला, गणेशवाडी, चाफोडी अशी गावे आहेत. या मार्गावर य्-जा करणाऱ्या लोकांची व व्यावसायिकांची पुलावर पाणी आल्यामुळे गैरसोय झाली आहे. या भागातील नागरिकांना पर्यायी वाहतूक म्हणून हळदी व बाचणी मार्गे जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे.