स्टेटस ठेवण्यावरून जो काही प्रकरण घडले त्याअनुषंगाने दोन गुन्हे दाखल झाले असून अशा पद्धतीने जर कोणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगून अफवांवर विश्वास ठेऊ नका असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
कोल्हापूरात काल पासून तणावपुर्ण वातावरण असताना आज वातावरण अधिक चिघळले काही ठिकाणी फोडाफोडी आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक आणि पोलीस महानिरिक्षक यांनी स्वता रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळली. यावेळी माध्यमांशी बोलताना अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले “आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावल्याने सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्य़ांवर त्याअनुषंगाने दोन गुन्हे दाखल झाले असून अशा पद्धतीने जर कोणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे. तसेच अशा प्रकारचे स्टेटस ठेवणाऱ्यांना अटक करण्यात आली असून बालगुन्हेगार न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.” अशी माहीती त्यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना पोलीस महानिरिक्षक सुनिल फुलारी म्हणाले, “पोलीसांनी यशस्वीपणे ही दंगल नियंत्रणात आणली असून प्रशासनाचा योग्य वापर करून आपण आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांनाही ताब्यात घेतले आहे. समाज माध्यमांवर काही अफवा आणि खोट्या माहीती पसरवण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या काही वेळात इंटरनेट सुविधा बंद करणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे.