प्रतिनिधी/कोल्हापूर
राजारामपुरी पोलीसांनी दुचाकी चोरटय़ाला अटक केली आहे. अरबाज लतीफ शेख ( वय 22 रा.अंडेवाली चाळ, जगदाळे डंक शेजारी, सुभाषनगर ) असे संशयिताचे नाव आहे. धनंजय संभाजी फाळके ( वय 37 अभिजित जाधव यांच्या घरी भाड्य़ाने, स्वामी गल्ली,जाधववाडी मार्केट यार्ड शेजारी) यांनी फिर्याद दिली आहे. 11 सप्टेंबर रोजी जवाहर नगर येथील रिक्षा स्टॉप जवळ पार्क केलेली फाळके यांची दुचाकी चोरीला गेली होती. पोलीसांनी तपास करुन संशयित शेख याला अटक केली आहे. पोलीस नाईक एस.पी.जाधव या गुन्हयाचा तपास करत आहेत.









