वन खाते ,पोलीस प्रशासन व एनजीओ संस्था सज्ज.
गोकुळ शिरगाव वार्ताहर
शुक्रवारी रात्री कोगील खुर्द ता, करवीर येथे सचिन मोरबळे (वय 27) याच्या घराशेजारी जवळपास अर्ध्या तास बिबट्या घोटमळत होता. हा सर्व प्रकार सचिन व त्याची आई घरात असताना खिडकीतून पाहत होते .बाहेरच त्यांचा कुत्रा भुंकत असताना हा सर्व प्रकार समोर आला अशी माहिती सचिन याने घाबरतच दिली. यावेळी त्यांनी आरडाओरड न करता सर्व ग्रामस्थांना फोनवरून ही माहिती दिली.
ग्रामस्थांनी ताबडतोब या घटनेची माहिती वनखात्याला कळवली वन खाते अलर्ट मोडवर येऊन त्यांनी रात्रीच ड्रोन कॅमेरा लावून रात्री एक ते दीडच्या सुमारास ड्रोन कॅमेरा द्वारे बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही मोहीम मध्यरात्रीपर्यंत चालू राहिली. या भागात प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांच्या बरोबरच शेतकरी वर्ग घाबरला आहे .शनिवार दिनांक 12 रोजी कोगील खुर्द मधील ग्रामस्थ शेतामध्ये जाण्यास कोणीही धजावले नाही. त्याचबरोबर प्रशासनाने ही सतर्क राहण्याचे आवाहन कोगील खुर्द ग्रामस्थांना केले आहे.
कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सह्याद्री डिझास्टर रेस्क्यू फोर्स ची टीम व गोकुळ शिरगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले . ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून आणि प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून तसेच पायाचे ठसे याच्यावरून तो बिबट्याच असल्याची खात्री झाल्यानंतर बिबट्या या वन्य प्राण्याविषयी ग्रामस्थांना काही माहिती दिली आणि सुरक्षेच्या दृष्टी कोणातून काय उपाय करता येतील याचीही माहिती . रेस्क्यू टीम यांनी सांगितली. तसेच गावातील जनावरे, पाळीव प्राणी यांना बंदिस्त जागेत ठेवण्यास सांगितले. तसेच लहान मुले आणि शेतकरी बांधवांनी एकटे फिरवू नये याविषयी मार्गदर्शन करून रात्री दोन वाजता टीम परत मागे फिरली.









