शिरोळ प्रतिनिधी
हिसडा मारून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन सराईत इसमांना शिरोळ पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याकडून चार मोबाईल एक मोटरसायकल असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. या गुन्हेगाराकडून दरोडा, जबरी चोरी, बलात्कार यासारखे दहा पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयताकडून आणखीन गुन्हे उघडीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बुरीगिड्डे यांनी दिली.
28 जानेवारी रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुनील सुखदेव हेरवाडे रा. धरणगुत्ती ता (शिरोळ) धरणगुत्ती ते जयसिंगपूर रोडने जात असताना संशयित आरोपी सचिन उर्फ पप्प्या गौतम माने वय वर्ष 35 (मूळ गाव इंदिरानगर सांगली सध्या राहणार चिपरी बेघर वसाहत चिपरी ता शिरोळ) व निलेश रणजीत माळी वय वर्ष 24 रा ₹इंदिरानगर सांगली) या दोघांनी फिर्यादीच्या हातातील मोबाईलला हिसडा मारून पळून गेले. याबाबत तातडीने शिरोळ पोलिसांना दिल्यावर दोघांना धरणगुत्तीच्या चौकात पकडण्यात आले. पोलिसांनी या दोघांची झडती घेतल्यावर चोरीचे चार मोबाईल सापडले.
त्यांची अधिक चौकशी केली असता सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, बलात्कार यासह अन्य अशा दहापेक्षा अधिक प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघड घेण्याची शक्यता पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगडे यांनी व्यक्त केली









