शासनाने केलेल्या हेल्मेट सक्तीला कोल्हापूरातून शिवसेनेने विरोध केला आहे. आधी कोल्हापूरातील रस्ते नीट करा आणि मग हेल्मेट सक्ती करा असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. कोल्हापूरातील ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून हा विरोध दर्शिवला असून याविरोधात त्यांनी आंदोलनाचा इशारा केला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी आम्हाला आधी रस्ते चांगले द्या मग हेल्मेट सक्ती करा असे आवाहन केले. या संबाधिचे निवेदन शिवसेना- ठाकरे गटाने कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. हे निवेदन देताना कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती होऊ देणार नाही अला इशारा दिला.
यावेळी बोलताना “हेल्मेट सक्तीला विरोध नाही. मात्र शहरातील तसेच जिल्ह्यातील रस्ते आधी चांगले द्या” अशी मागणीशिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून परिवहन अधिकाऱ्यांना केली आहे. पुढच्या आठवड्यापासून य़ा हेल्मेट सक्तीच्या कारवाईला सुरूवात होणार असून सुरुवातीला हेल्मेट वापरण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे. यासंबंधीची व्यापक मोहिम जिल्हाभर राबवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी केले स्पष्ट आहे.









