कृष्णात पुरेकर,कोल्हापूर
जिल्ह्यात गतवर्षी याच दिवसांत सरासरी तापमान 35 अंशाच्या खाली होते, यंदा मात्र याच काळात तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसकडे सरकला आहे. पुढील सप्ताहभर ही स्थिती राहणार आहे. तापमान चाळीशीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान ऊन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी 12 ते सायंकाळी पाच वाजेपर्यत रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने पस्तिशी पार केली आहे. या काळात सरासरी तापमान 37 अंश सेल्सिअसइतके होते. गुरूवारी, 13 एप्रिलला गतवर्षी कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके होते. आज दुपारी 12 च्या सुमारास तापमानाचा पारा 39 अंशावर तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. तसेच गतवर्षी 9 मे रोजी जिल्ह्यात 40.3 अंश सेल्सिअसइतकी नोंद झाली होती. त्यामुळे सरासरी तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील सप्ताहभर तापमान अनुक्रमे शुक्रवारी, 38, शनिवारी, 37, रविवार, सोमवारी 38 अंश तर मंगळवार, बुधवारी तापमानाचा पारा चाळीशी गाठण्याची शक्यता आहे. या सप्ताहात किमान तापमान 22 ते 23 अंश इतके राहणार आहे. 2019 मध्ये जिल्ह्यात 41.2 या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. 34 वर्षापुर्वी 1988 मध्ये 42.3 इतक्या तापमानाची नोंद झाली होती. आजपर्यत पारा यापुढे गेलेला नाही. पण हवामान विभागाने पुढील दोन महिने तापमानात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.
उन्हाच्या कडाक्यामुळे शहरासह जिल्ह्यात सकाळी 11 नंतर सायंकाळपर्यत जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहेत. ग्रामीण भागात या काळात शुकशुकाट दिसून येत आहे. रस्त्यांवर दुचाकीधारकांना उन्हाच्या झळांशी सामना करावा लागत आहे. उष्मा वाढल्याने घरोघरी, फॅन, कुलर, एसी सुरूच आहेत. मध्यरात्रीपर्यत उष्मा जाणवत असल्याने रात्रभर पंख्याचाच वारा, असे चित्र आहे. तापमान चाळीशीकडे झुकल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. आरोग्य विभागाने त्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचे तसेच उष्म्यापासूर संरक्षणासाठी टोपी, स्कार्फ, गॉगल्स वापरण्याचे आवाहन केले आहे. उष्म्यामुळे शीतपेयांच्या गाड्यांवर, दुकानांमध्ये गर्दी आहे. ऊसाचा रस, लिंबू सरबताला मागणी वाढली आहे. कलिंगडाची आवक अधिक असून मागणीही वाढली आहे. आईस्क्रिमची दुकाने, गाड्यांवरही गर्दीचे चित्र आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









