सावंतवाडी : प्रतिनिधी
भाजप युवा नेते संदिप गावडे आयोजित डे -नाईट राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता मानाच्या चषकावर कोल्हापुर येथील “शिव स्पोर्ट संघाने नाव कोरले तर पारसे गोवा येथील “डॅडीज लव्ह” या संघाने उपविजेतापद पटकावले. येथील जिमखाना मैदानावर २ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून नयन सुर्यवंशी याला तर शिस्तबध्द संघ म्हणून शिवस्पोर्टस कोल्हापुर या संघाला गौरविण्यात आले.
भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा समारोप काल रात्री उशिरा झाला. २ दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी तब्बल ३० संघ सहभागी झाले होते. यात गोव्यातील संघासह कोल्हापुर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघाचा समावेश होता.या स्पर्धेचे बक्षिस वितरण संदिप गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. सिंधुदूर्गात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी .. प्रयत्न करणार असे ते म्हणाले या स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाइन ही स्पर्धा पाहिली तसेच या स्पर्धेतील खेळाडूंना ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.