उत्रे / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील आळवे येथे मा. खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारत फोर्ज यांच्या संयुक्त विद्यमाने विदया मंदिर, आळवे या शाळेत सुमारे दिडशे कलमी आंब्याची रोपे वाटप करण्यात आली.
सुमारे तीस हजार रुपये किंमतीची दिडशे रोपे वाटप करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा ‘लय भारी’ विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहेत. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच अनेक शाळा यांना मदत केली आहे सांगितले.
यावेळी पन्हाळा तालुक्याचे अध्यक्ष विक्रम पाटील, शाळा समिती अध्यक्ष धर्मराज खामकर, उपाध्यक्ष रुपाली यादव, मुख्याध्यापक विलास कुंभार, संजय पाटील, संजय औंधे, बाबासाहेब काकडे, केशव मगर, तानाजी कुंभार, निखिता कुंभार, सरदार पाटील, सर्व सदस्य, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.