कसबा बीड/ प्रतिनिधी
पाडळी खुर्द ता.करवीर येथील सोनाली गौरव पाटील (वय-22) ही महिला दोन दिवस झाले बेपत्ता झाली होती,या महिलेचा मृतदेह पाडळी खुर्द येथील विहिरीत सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील सोनाली (माहेर पनुत्रे ता. पन्हाळा ) हिचा विवाह गौरव पाटील यांच्याशी झाला होता.त्याच्या विवाहास तीन वर्षे झाली होती.त्यांना एक वर्षीय छोटा मुलगा आहे.नंदवाळ येथे पायी दिंडीस जाणार होती. सोनाली गुरूवारी 29 जून रोजी सकाळी घरी कोणाला न सांगता बाहेर पडली होती.ती घरी परत आलीच नाही. सोनाली घरी आली नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. मात्र ती सापडली नाह.
काल सकाळी ८ च्या सुमारास शेतातील विहिरीमध्ये एक मृतदेह तरंगताना नातेवाईकांना दिसला.29 जून पासून बेपत्ता असलेल्या सोनाली पाटील हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सीपीआर येथे पाठवण्यात आला. मयत सोनालीच्या नातेवाईकांनी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असावी अशी शंका उपस्थित करत पोलीस प्रशासनाने आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली.सदर घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास सुरू आहे.









