राज्यसेवा 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेची गुरुवारी रात्री उशिरा गुणवत्ता यादी जाहीर झाली . या परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे. इचलकरंजी येथील तन्मय मांडरेकर यांनी दहावी रंग तर कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील रोहित कुंभार यांनी 46 वी रँक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेमध्ये रोहित कुंभार यांनी 46 रँक मिळवत यश संपादन केले. रोहित यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण वि स खांडेकर प्रशाला शाहूपुरी येथे झाले तर अकरावी बारावी विवेकानंद कॉलेज येथे पूर्ण केले त्यानंतर पुणे येथील सीओईपी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये झालेली महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा दिले. या परीक्षेचा निकाल दीड महिन्यापूर्वी जाहीर झाला होता. तर आज मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मुलाखतीनंतर कुंभार यांनी 46 वी रँक मिळवली आहे.अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे पडताळणी,प्रमाणपत्र पडताळणीमुळे यात बदल होऊ शकतो.
दरम्यान, गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना पदांचे पसंती क्रमांक ऑनलाइन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांची राजपत्रित गट अ किंवा राजपत्रित गट ब मधील पदांवर नियुक्ती होईल . कुंभार यांचे वडील दिलीप कुंभार पोस्ट खात्यामध्ये लिपिक पदावर कार्यरत आहेत तर गणपती बनवण्याचा त्यांचा व्यवसाय असून आई वैशाली हा व्यवसाय पहात आहेत. या यशासाठी त्यांना त्यांचे शिक्षक आई-वडील नातेवाईक मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले नियमित पुस्तकांचा अभ्यास आणि सेल्फ स्टडी वर त्यांनी भर दिला होता जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे हे यश संपादन झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच भविष्यामध्ये उपजिल्हाधिकारी या पद मिळवण्याचा त्यांचा मानस आहे.