सांगरुळ /वार्ताहर
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात शेवटच्या टोकाला असलेल्या मठाचा धनगरवाडा आणि मारुतीचा धनगरवाडा येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एस टी बस पोहचली आहे. वाड्यावर पहिल्यांदा बससेवा सुरु झाल्याने ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून, ग्रामस्थांनी एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत. धनगरवाडा येथे पहिल्यांदा आलेल्या चालक यांचे ग्रामस्थानी अभिनंदन करून बसला फुलांचा हार घालून तसेच नारळ फोडून पूजा केली आणी आपला आनंद व्यक्त केला.
कुठे मेट्रो, तर कुठे बुलेट ट्रेन धावत आहे. पण, अजूनही ग्रामीण भागातील दुर्लक्षित असलेल्या .काही गावे आणि वाड्यावस्त्यांवर एस.टी. महामंडळाची बस पोहोचली नसल्याचे दिसून येते. करवीर तालुक्यातील मठाचा धनगरवाडा आणि मारुतीचा धनगरवाडा हे यापैकीच एक धनगरवाडे आहेत . करवीर तालुक्याचे पश्चिमेकडील मारुतीचा धागरवडा हे शेवटचं टोक आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी बोलोली किंवा उपवडे या ठिकाणी पायपिट करत यावे लागत होते .ग्रामस्थांना कामानिमित्त बाहेर प्रवास करायचा असेल तर बोलोली किंवा उपवडे या ठिकाणी यावे लागत होते. धनगर वाड्यावरील ग्रामस्थांच्या व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बोलोली आणि उपवडे ग्रामपंचायतकडून एस.टी. बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस येथे पोहोचली. येथील धनगर बांधवांना . बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.