शिये वार्ताहर
शिये (ता करवीर )येथील माळवाडी भागातील बाळुमामा मंदिरासमोर कृष्णात पांडुरंग रानगे यांच्या सहा दिवसाच्या दोन करड्यांवर( शेळीचे पिल्लू) भटक्या कुत्र्याने हल्ला करून ठार केले.शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ज्या ठिकाणी बकरी ठेवण्यात आली होती त्या ठिकाणी कुत्र्यांचा कलकलाट ऐकू आल्यानंतर भगवान वाघमोडे व संकेत रानगे त्या ठिकाणी गेले तर एका कोकराला घेऊन तोंडात घेऊन कुत्री जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कुत्र्यानां हटकल्यानंतर करडे टाकून कुत्रे पळून गेली. तर ज्या ठिकाणी बकरी ठेवण्यात आली होती त्या ठिकाणी दुसरे कोकरू पोटावर हल्ला व कान खाल्लेल्या स्थितीत ठार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनास्थळी वन विभागाचे कृष्णात दळवी, के. बादरे , रेस्क्यूचे प्रदीप सुतार यांनी पाहणी केली. दरम्यान गुरुवारी अनिल पाटील यांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केला होता.
घटनास्थळवरील शेतक-याच्या शेडमध्ये आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार अमल महाडिक, शेतकरी संघटनेचे अॅड. माणिक शिंदे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी वन विभागाचे अधिकारी ते थेट वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत संपर्क साधल्याने वनविभागाने दोन ठिकाणी सापळा व कॅमेरे लावले होते. ज्या ठिकाणी रेड कवर हल्ला झाला होता त्या ठिकाणी लावलेल्या सापळ्यात रात्री कुत्रे कैद झाल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.









