पुलाची शिरोली / वार्ताहर
“सन २०१९ नंतर पराभवाचे अनेक धक्के महाडिक परिवार व कार्यकर्त्यांनी सहन केले आहेत. या पराभवामुळे आपले राजकीय खच्चीकरण झाले होते. पण आपण डगमगलो नाही. अखेर भारतीय जनता पक्षाने आपणास राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. सर्वांच्या सहकार्याने विजयी झालो.” अशी प्रतिक्रिया नुतन खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. ते पुलाची शिरोलीत स्वागत प्रसंगी बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक यांचे पुलाची शिरोलीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना साष्टांग नमस्कार घालून खासदार महाडिक यांनी आशिर्वाद घेतला. त्यानंतर महाडिक कुटूंबाच्यावतीने फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
“यावेळी खासदार महाडिक यांनी पराभवाचे अनेक धक्के महाडिक परिवार व कार्यकर्त्यांनी सहन केले आहेत. या पराभवामुळे आपले राजकीय खच्चीकरण झाले होते. पण आपण डगमगलो नाही. अखेर भारतीय जनता पक्षाने आपणास राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष राजकीय निती व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सह इतरांनी केलेल्या सहकार्यामुळे आपला विजय झाला” असे महाडिक यांनी सांगितले.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून भाजप व महाडिक गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले होते. खासदार महाडिक यांचे दुपारी तीनच्या सुमारास महाडिक यांच्या बंगल्यात आगमन झाले. यावेळी फटक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी माजी आमदार अमल महाडिक, स्वरुप महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, मंगलताई महाडिक, ग्रिष्मा महाडिक, विश्वास महाडिक, ओम महाडिक यांचेसह दलितमित्र अशोकराव माने, नगरसेवक सत्यजित कदम, विलास वास्कर, विजय सुर्यवंशी, छ.राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, शिवाजी रामा पाटील, रावसाहेब चौगले, श्रीकांत सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, सतिश पाटील, धनाजी पाटील, डॉ. सुभाष पाटील, सलिम महात, योगेश खवरे, बाळासो पाटील, शब्बीर देसाई, पिंटू करपे व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.