शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील अपघातामध्ये गावच्या सरपंचांचे पतीचा दुर्दैवी मुत्यु झाल्याची बातमी समोर येत आहे.आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रॅक्टर मधून बस्तवाड गावाकडे जात असताना महापूराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅक्टर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. या घटनेमध्ये ७ जण वाहून जात होते.
दरम्यान, वाहून गेलेल्यापैकी दोघेजण बस्तवाढ गावाकडे पोहत जाऊन त्यांनी स्वताचा जीव वाचवला. तर अन्य चौघांना एनडीआरएफच्या बोटीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यामध्ये अकिवाट गावचे सरपंचाचे पती सुहास पाटील यांचा समावेश होता. पण त्यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी पळवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
या अपघातामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब हासुरे हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध एनडीआरएफ, रेस्क्यू फोर्स, विजीर रेस्कूफोस, व्हाईट रेसक्युफोर्स आणि कर्नाटक परिसरातील कर्नाटक शासनाच्या दोन बोटी अशा एकूण आठ बोटी शोध घेत आहेत. दुपारपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. घटनास्थळी तहसीलदार अनिल हेळकर आणि अधिक बंदोबस्तासाठी कुंरूदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत फडणवीस उपस्थित आहेत.