तीन महिन्यापूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग काढत कोल्हापुरातील एका टोळक्याने एका कुटुंबाचे घर जाळले आहे. घरातील प्रापंचिक साहित्य एकत्र करत महिलेला कोंडून ठेवत घरातील कपडे, कॅमेरा, डीव्हीआर, मोबाईल आणि इतर साहित्य जाळत हल्लेखोरांनी धुडगूस घातला. तब्बल अर्धातास हा प्रकार सुरु होता. संबंधित कुटुंबातील महिलेला देखील मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे 15 ऑगष्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. याची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक यांच्यासह अन्य पोलीस पथक दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी सात जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजू बोडके (रा. लक्षतीर्थ वसाहत) उमेश कोळापटे, विश्वजित फाले(रा. बोद्रेनगर) यांच्यासाह चार आज्ञताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तीन महिन्यांपूर्वी फुलेवाडी रिंगरोड इथे वाढदिवसाचा बॅनर फाडल्यावरून लक्षतीर्थ येथे राहणाऱ्या संतोष बोडके याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्याचा राग मनात धरून बोडके यांच्या कार्यकर्त्यांनी फुलेवाडी रिंगरोड येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई आणि शिंगाणापूर येथे राहणारे नितीन वरेकर यांच्या घरावर हल्ला करत आलिशान कार जाळली होती. काल रात्री पुन्हा एकदा बोडके यांच्या कार्यकर्त्यांनी वरेकर यांच्या घरावर हल्ला करत घर जाळण्याचा प्रयत्न केला.
रात्री साडेआठच्या दरम्यान सुमारे सात ते आठ अज्ञात तरुण याठिकाणी येत प्रचंड दहशत माजवत आणि शिवीगाळ करत घरात घुसले. त्यानंतर घराच्या बेडरूम मध्ये जाऊन कपडे प्रापंचिक साहित्य गोळा करत पेटवून दिले. तसेच घरातील एका महिलेला देखील मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलीस उपाधीक्षक सह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याची सर्व माहिती घेत त्याने अज्ञात संशय त्यांचा तपास सुरू केला. त्यांच्यावर करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
वरेकर कुटुंबीय दहशदीखाली
प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितीन वरेकर हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. तर त्याचे कुटुंब शिंगणापूर येथे राहते. बोडके यांच्या कार्यकर्त्यांनी मागील वेळी घरात घुसून आलिशान कारची जाळपोळ करत घरातील सर्व साहित्याची तोडफोड केली होती. तर अनेक वेळा घरात येऊन घरातील महिलांना जीवे मारण्याची धमकी त्यांच्या कार्यकर्त्याकडून दिली जाते. तसेच चोरट्य़ांनी रोख रक्कंम आणि सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचे वरेकर कुटुंबियांनी सांगितले. या संदर्भात वरेकर कुटुंबियांनी वारंवार करवीर पोलिसांना माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून दखल घेत जात नसल्याचे वरेकर कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यानंतर आज पुन्हा हल्ला झाल्याने वरेकर कुटुंबीय दहशतीखाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









