शाहूवाडी/प्रतिनिधी
पिशवी पैकी वरेवाडी येथील मांडलाईच्या जंगलात विनापराना चोरटी शिकार करणाऱ्या पाच जणांना वनविभागाच्या पथकाने पकडून शाहूवाडी न्यायालया समोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कडून दोन मोटरसायकली सह, दोन बंदूका, दोन मृत ससे, दोन मृत पिसुरेचे मांस असे मिळून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.
बेकायदेशीर शिकार केल्या प्रकरणी बबलू उर्फ प्रवीण विश्वास बोरगे (वय २९) नाना उर्फ बाजीराव बाबू बोरगे (वय ४५), पिंटू उर्फ मारूती पांडुरंग वरे (वय ३०), पोपट उर्फ संजय हिंदूराव भोसले (वय ३३), रामचंद्र बाळू बोरगे (वय ३३ रा. सर्व पिशवी पैकी वरेवाडी ता. शाहूवाडी जि कोल्हापूर) अशी अटक लेल्यांची नवे आहेत. तर आबाजी बाजीराव बोरगे, अमोल शिवाजी रवंदे हे दोघेजण पळून गेले आहेत. ही घटना गुरूवार दि २६ रोजी मध्य रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वनविभागाकडून मिळालेली महिती अशी, गुरुवार दि २६ मे रोजी पिशवी पैकी खोतवाडी, वरेवाडीच्या जंगलात दहा जण शिकारीसाठी जाणार असल्याची गोपणीय महिती मलकापूर वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी अमित भोसले यांना मिळाली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करून खोतवाडी – वरेवाडी – कुंभारवाडी येथे सापळा रचला होता. कुंभारवाडीच्या हुलवाणी क्षेत्रात बंदूकीच्या गोळीचा आवाज ऐकू आला. वनविभागाच्या पथकातील कर्मचारी सावध झाले. रात्री बारा वाजता मोटार सायकल वरून तिघेजण जात असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठलाग करून प्रवीण बोरगे, बाजीराव बोरगे, मारुती वरे, संजय भोसले यांना पकडले. तर आबाजी बोरगे फरार झाला. त्यांच्या कडून दोन मृत ससे, दोन मृत पिसुरे, एक बंदक, १३ जिवंत काडतुसे, सहा वापरलेली काडतुसे असा मुद्दे माल जप्त करण्यात आला. सहाय्यक उपवन अधिकारी सुनील निकम, वनाधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक, वनसेवक आदींनी सहभाग घेऊन कारवाई केली.









