शाहुवाडी प्रतिनिधी
माण पैकी धनगरवाडा तालुका शाहूवाडी येथील भागोजी दाखलू कस्तुरे यांच्या चरावयास सोडलेल्या सहा ते सात बकऱ्यांची अज्ञातानी ओमनी गाडीत घालून चोरी केल्याची घटना घडली . सुमारे पन्नास हजाराची बकरी गेल्याने या शेतकरी बांधवासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे .
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मान पैकी धनगरवाडा येथील भागोजी धाकलू कस्तुरे हे मलकापूर अनुस्कुरा मार्गावर बकरी करावयास घेऊन गेले होते . याच दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या ओमनीतील अज्ञातानी धाकलो कस्तुरी यांच्या जवळ जाऊन आपल्याकडील शंभर रुपये दिले व समोरून ताक आणण्यास सांगितले .मदत करण्याचा भावनेने दाखलू कस्तुरे ताक आणण्यासाठी गेले असता मागे परत येऊन बघतात तर त्यांच्या चरावयास सोडलेल्या बकरी दिसून आली नाहीत . त्याबरोबर ज्यांनी ताक आणण्यास पाठवले ते देखील त्या ठिकाणी दिसून आले नाहीत त्यांनी इतरत्र शोध घेतला असता त्यांच्या निदर्शनास आले की संबंधितांनी ओमनी गाडीतून आपली बकरी चोरून नेली आहेत .
दरम्यान याबाबतची पोलीस ठाण्यात नोंद देखील झालेली नाही . मात्र एका गरीब भोळ्या भाबड्या धनगर बांधवाला फसवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . आता या चोरीचा छडा लागणार का आणि त्या गरीब धनगर बांधवाला आर्थिक मदत होणार का हा देखील महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे . त्यातच असणारे मलकापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने या ओमनीचा शोध लागणार तरी कसा .ग्रामीण भागात अशा भुरट्या चोरीचे अनेक प्रकार घडत असल्याची चर्चा सुरू आहे . याकडे लक्ष देणार कोण याबाबत नागरिकांच्यात ही चर्चा सुरू आहे .









