वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील सातवे परिसरात सातत्याने बिबट्यांच्या वावराने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. सातवे येथील ब्राम्हणांच्या मळ्यातील संजय मोरे यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून एक ते दीड महिन्याच्या लहान रेडकाचा बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. बिबट्याने रेडकाचे दोन ते तीन जागी लचके तोडले. आज सोमवार दि.२ रोजी पहाटे साडे पाच वाजलेच्या सुमारास संजय मोरे हे जनावरांच्या शेड मध्ये गेले असता. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार दिसून आल्याचे सांगितले.
सातवे व परिसरात वारंवार बिबट्याचे नागरिकांना दर्शन होते.यापूर्वी सायंकाळच्या सुमारास मेंढीच्या कळपावर हल्ला चढवला होता. त्यात एका मेढींचा फडशा पाडला होता पंधरा ते वीस दिवसा पुर्वी खोरी या शिवारात अभिजित प्रताप मोरे यांच्या शेतामधील जनावरांच्या गोठ्यातील दोन ते तीन महिन्यांच्या पाडीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते.
सातवे परिसरात बिबट्याचा वावर आणि दोन महिन्यात लहाण प्राण्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण आहे. शेतात वैरण व इतर कामांसाठी जाताना एकटे न जाता दोघे तिघे जातात एवढी दहशत बिबट्या मुळे निर्माण झाली आहे.
बिबट्याचा वावर वाढल्याने वारणा परिसरात शेतीला दिवसा विज पुरवठा करावा
वारणा नदी तिरावरील दोन्ही बाजू च्या गावातील शेतातील पिकात शेतमळ्यातील वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे सातवे परिसरात लहाण प्राण्यावर हल्ले झाले तसेच नदीपलीकडील चिकुर्डे – ऐतवडे खुर्द रोडवर देवर्डे हद्यीत रात्रीच्या वेळी वाहनाला धडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला या घटना अलीकडील काळातील आहेत.
वारणा परिसरातील शेतकर्यांना रात्रीपाळीने तीन दिवस पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते ऊसासारखी उंची पिके असल्याने रात्रीचे शेतात जाणे शेतकऱ्यांना धोक्याचे झाले आहे त्यामुळे विज मंडळाने वारणा परिसरात शेतकऱ्यांना सातही दिवस दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी करणार आहे.