Rajaram Sugar Factory Election : राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या 29 उमेदवारांना साखर सहसंचालक अशोक गाडे यांनीही अपात्र ठरवले. संबंधित उमेदवारांना मध्यरात्री बारा वाजता निकालाचे पत्र देण्यात आले.
राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज छाननी आमदार सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी अपात्र ठरवले. निवडणूक अधिकाऱ्यांचा हा निर्णय मान्य नसल्याने परिवर्तन आघाडीने साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे अपील केली होती. तसेच सुमारे एक लाखाहून अधिक कागदपत्रांचे पुरावे गाडे यांच्याकडे सादर केले होते. 4 व 6 एप्रिल रोजी साखर सहसंचालक यांच्यासमोर सुनावणी झाली होती. साखर सहसंचालक गाडे यांनी सुनावणीचा निकाल राखीव ठेवला होता. सोमवार 10 रोजी यावर निकाल होणे अपेक्षित होते. मात्र मध्यरात्री बारा वाजताच अपात्र साखर सहसंचालक गाडे यांनी निकालाचे पत्र संबंधित उमेदवारांना दिले आहे. यामध्ये त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.









