सरवडे प्रतिनिधी
कागल तालुक्यातील बिद्री ते सुळकुड दरम्यानच्या गावातील ऊस भात भुईमूग सोयाबीन आधी पिके पाण्याविना कोमजून गेली आहेत यामुळे गेल्या तीन महिन्यात शेतक्रयांनी केलेला खर्च वाया गेला आहे सुमारे बाराशे हेक्टर क्षेत्रातील पिके वाळून गेले आहेत यामुळे शेतक्रयाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे काळमवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे अन्यथा राज्यमार्ग बंद करण्याचा इशारा वाळवे खुर्द इथल्या शेतक्रयांनी दिला आहे.
बिद्री ते सुळकुड दरम्यानच्या गावात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेली भात भुईमूग सोयाबीन नागली आणि ऊस पिके कोमेजू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. सध्या सर्वच ठिकाणा पाण्याची अत्यंत गरज आहे मात्र पाऊस नसल्याने पिकांची अवस्था वाईट झाली आहे. भात पिके तर पूर्णता वाळून गेले आहे, त्यामुळे गेल्या तीन महिन्यात केलेले कष्ट आणि पैसे वाया गेले आहेत. या पिकांना जीवदान म्हणून काळामवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले तर थोड्या प्रमाणात पिके राहतील अन्यथा शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.
सुमारे बाराशे हेक्टर क्षेत्रातील पिके वाळून गेली आहेत. यामुळे शेतक्रयाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. भात पीक करत असताना शेतक्रयांना गुंठ्याला एक हजार रुपये खर्च आला आहे. मात्र भात पोसवायच्या दरम्यानच पावसाने दडी मारल्याने भात पिके धोक्यात आली आहेत. या परिसरातील 25 हून अधिक गावातील शेतक्रयांनी पाटबंधारे विभागाच्या अधिक्रायांना उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले आहे. तात्काळ पाणी सोडलं नाही तर कोल्हापूर- गारगोटी राज्य मार्ग बंद करून उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतक्रयांनी दिला आहे
चाऱ्याचा प्रश्न गंभीर
कसबा वाळवे परिसरातील आज शंभरहून अधिक शेतकरी जमले होते. त्यांनी निढोरी पाटबंधारे विभागाच्या अधिक्रायांना निवेदन दिले आहे. पाऊस नसल्याने शेतक्रयांच्या पिकाबरोबर जनावरांच्या च्रायाचाही प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडून किमान पिकांना तरी जीवदान मिळेल अशी अपेक्षा शेतक्रयांची आहे.
बाळासो पाटील, वाळवे खुर्द









