कोल्हापूर प्रतिनिधी
शाहू सलोखा मंचच्या वतीने शनिवारी (दि. 17 जून) सलोखा बैठकीचे आयोजन केले आहे. सायंकाळी 5:30 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ही बैठक होणार आहे. बैठकीला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : शाहू विचारधारा जपणाऱ्या कोल्हापूरची सामाजिक समतेची आणि बधूंभावाच्या एकोप्याची परंपरा बिघडणाऱ्या घटना जिह्यात घडू लागल्या आहेत. राजर्षी शाहूंच्या नगरीत गतआठवड्यात घडलेल्या घटनेने सामाजिक सलोख्याला गालबोट लागले आहे. संपूर्ण शहर अस्वस्थ झाले आहे. अशा प्रसंगी राजर्षी शाहूंची सलोख्याची परंपरा कायम राखण्यासाठी शनिवार (दि. 17) सायंकाळी 5:30 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सलोखा बैठकीचे आयोजन केले आहे. तरी स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेने बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे.









