चिपळूण/प्रतिनिधी -:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी शनिवारी रात्री चिपळूण दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन स्वागत केले.
एकीकडे उबाठाचे नेते भास्कर जाधव हे राज्यात महायुतीवर आक्रमकपणे तुटून पडत असताना आणि गुहागरमधून विक्रांत जाधव यांच्या उमेदवाराची चर्चा सुरू आसताना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र विक्रांत जाधव यांनी ही भेट शिष्टाचाराचा भाग असल्याचे स्पष्ट केले.








