शाहुवाडी प्रतिनिधी
मलकापूर शहरातील कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे
मलकापूर शहरातील कोल्हापूर नाक्यावर रस्त्याच्या मध्यभागी पडलेले खड्डे पावसाळ्यात चांगलेच धोकादायक ठरू लागले आहे डबऱ्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अनेक अपघात सदृश्य घटनांना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी असणारी नागरिकांची वर्दळ होत असलेली वाहनांची गर्दी आणि त्यातच सुरू असलेला पाऊस यामुळे या ठिकाणावरून जाणारी लहान मुले वृध्द नागरीक यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून या मुख्य मार्गावरील पडलेले खड्डे मुजवावेत अशी मागणी नागरिकांच्या हातून होऊ लागली आहे
फोटो
मलकापूर शहरातील कोल्हापूर नाक्यावर रस्त्याच्या मध्यभागी पडलेले खड्डे आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे नागरीक ( छाया : संतोष कुंभार )
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









