संभाजीराजे छत्रपतींना निमंत्रण
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी 6 मे रोजी आहे. या निमित्ताने राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये शाहू स्मृती शताब्दी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना या कॉलेजच्या वतीने खास निमंत्रण देण्यात आले आहे. आज मंगळवारी संभाजीराजे या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित राहणार आहेत.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांच्या कार्यास मानवंदना देण्यासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी गुजरातमधील राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये 1886 ते 1889 या काळात शिक्षण घेतले. त्या कॉलेजशी संभाजीराजे यांनी स्मृती शताब्दीची माहिती देणारा पत्रव्यवहार केला होता. कॉलेज प्रशासनाने शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगता या कार्यक्रमाला संभाजीराजे यांना निमंत्रित केले होते. या निमंत्रणास प्रतिसाद देत, छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी संभाजीराजे आज मंगळवार (3 मे) रोजी राजकुमार कॉलेज, राजकोट येथे उपस्थित राहणार आहे. या विशेष कार्यक्रमास कॉलेजचे प्रमुख विश्वस्त ठाकूर जितेंद्रसिंहजी, मुळी यांच्यासह कॉलेज प्रशासनाचे विश्वस्त व व्यवस्थापकीय मंडळ उपस्थित राहणार आहे. तर
भावसिंहजी महाराज यांच्या भावनगरमध्ये स्मृती शताब्दी
शाहू महाराज राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे शिकत असतानाच त्यांचे सहाध्यायी असलेले भावनगरचे महाराज भावसिंहजी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली. दोघांनीही ही मैत्री आयुष्यभर जपली. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरातील राजमार्गाला ‘भावसिंहजी रोड’ असे नाव दिले, तर भावसिंहजी महाराजांनी देखील आपल्या महूआ येथील राजवाड्य़ास शाहू पॅलेस असे नाव दिले होते. आजही छत्रपती घराण्याचे भावनगर राजघराण्याशी आपुलकीचे संबंध आहेत. भावनगर राजघराण्याने देखील राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी (4 मे) नीलमबाग पॅलेस, भावनगर (गुजरात) येथे कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमालाही संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. भावनगर येथील राजवाड्य़ात होणाऱ्या या कार्यक्रमास भावनगरचे महाराज विजयराज सिंह गोहिल, युवराज जयवीरराज सिंह गोहिल व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.