मुरगूड,वार्ताहर
मुरगूडात भाच्याकडे राहावयास आलेला कोल्हापुरातील राजेंद्र नगरचा इसम काल (ता. 25) सकाळी येथील गावभागातील एका बागेत मयत स्थितीत आढळून आला.प्रभाकर भिमराव भोसले (वय- ४३ ) असे मयत इसमाचे नाव असून, घटनेची नोंद मुरगूड पोलिसात करण्यात आली आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, राजेंद्रनगर मधील घरी एकटाच राहणारा प्रभाकर भिमराव भोसले हा मुरगूडातील भाचा रोहीत अनिल खवले याच्या घरी पंधरा दिवसापूर्वी राहणेस आला होता.तो दिवसातुन बराच वेळ घराचे बाहेरच थांबायचा. रविवारी सकाळी ७.३० नंतर तो घराबाहेर गेला. दरम्यान, गावभागातील मारुती मंदिराच्या मागे असणाऱ्या विजयमाला मंडलीक उद्यानामध्ये तो सकाळी ११.३० वा. च्या सुमारास मयत स्थितीत मिळुन आला. रोहीत खवले याने पोलिसात माहिती दिली.
पोलिस तपासानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत प्रभाकर भोसले हा अविवाहीत होता.चार चाकी वाहनाचा तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा,पण दारूचे व्यसन असल्याने त्याला काम मिळत नव्हते. त्याच्या पश्चात भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.अधिक तपास पोलिस नाईक व्ही.डी.माने करीत आहेत.