कोल्हापूर : जिल्ह्याला आज दिवसभर मूसळधार पावसाने झोडपले आहे. शिरोळ वगळता आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाची मुसळधार बॅटिंग सुरू आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे, आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. त्यावरून धोकादायक वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
मॉन्सूनला सुरुवात झाल्यापासून आज सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. आतापर्यंतपर्यंत पावसाचा जोर कायम असून धरण क्षेत्रातही मुसळधार पावसाची झाली आहे. त्यामुळे गेल्या १२ तासाच्या नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत राहिली. आज दुपारी बारापर्यंत राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्यासाठी 1 ते दीड फुटच पाणी कमी होते. सायंकाळी साडे सातच्या सुमारा बंधारा पाण्याखाली जावून बंधाऱ्यावर सुमारे अर्धाफूट पाणी वाहत होते. हे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सकाळपर्यंत राधानगरी धरणातील पाणीसाठा २३ टक्के पाणीसाठा होता. पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील आज ७ पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत.
दरम्यान, ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी तरुण भारतशी बोलताना केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









