गारगोटी प्रतिनिधी
Kolhapur Rain Update : गारगोटी कोल्हापूर रस्त्यावर मडिलगे बु च्या बस स्टॉप नजीक वेदगंगा नदीचे पाणी रस्त्याच्या पातळीबरोबर आले आहे.पावसाचा जोर कायम असल्याने संध्याकाळ पर्यंत पाणी रस्त्यावर येणार शक्याता आहे. यामुळे गारगोटी कोल्हापूर या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद होईल.
नवीन रस्ता झाला परंतु पुर आल्यास पाणी जाणेस वाट नसल्याने सातत्याने येथे पाणी रस्त्यावर येत असते. पर्यायाने तालुक्याचा कोल्हापूर शी होणारा संपर्क तुटतो. म्हसवे नजीक ची मोरओहोळ सुध्दा तुडुंब भरून वाहत आहे. तर दारवाड येथील पेट्रोल पंपानजीकच्या ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने भुदरगडातून कोल्हापूरकडे जाणारी दोन्ही रस्त्यावरील वाहतूक बंद होऊ शकते.









