शिरोळ, प्रतिनिधी
Shirol Rain Upadate : शिरोळ व परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वारासह अवकाळी पावसाने झोडपून काढले या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा , शाळू, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे ऊस पिकासाठी हा पाऊस उपयुक्त झाला आहे.
शिरोळ व परिसरात गुरुवारी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास प्रचंड विजेचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धातासाहून अधिक पाऊस पडत होता. पावसाने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. काही ठिकाणी झाडे उमलून पडली होती, झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने विजेच्या तारा रस्त्यावर पडल्या होत्या. वेळीच वीज पुरवठा खंडित केल्याने जीवित हानी झाली नाही.
गेले पंधरा दिवस झाले प्रचंड उष्माने नागरिक हैराण झाले होते. या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला या अवकाळीमुळे हाता तोंडाला आलेला गहू व शाळू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच प्रचंड वादळ व विजेच्या कडकटांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालू वर्षी प्रथमच अवकाळीने जोडपून काढल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









