प्रतिनिधी,कोल्हापूर
जिह्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरु असून काढणीस आलेली खरीप पिके धोक्यात आली आहेत. दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे शेतकऱयांनी धास्ती घेतली आहे. दुपारपर्यंत उघडीप आणि सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस असे सत्र गेले आठ दिवस सुरु असल्यामुळे बळीराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी शिवारात पाणी साचल्यामुळे गाळप हंगामाचा शुभारंभ लांबणीवर पडणार आहे. पंचगंगेची पाणीपातळी 15 फुटांवर आहे.
शहरात सलग दोन ते अडीच तास झालेल्या अतिवृष्टीमुळे व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी व्यापारपेठ, सीपीआर चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, परिख पूल परिसर, राजारामपुरी येथील जनता बझार चौक आदी शहरातील सखल भागात तळ्य़ाचे स्वरूप प्राप्त झाले होते. करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, कागल आणि भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर इतरत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
गेल्या 24 तासात चंदगडमध्ये सर्वाधिक पाऊस
गेल्या 24 तासात चंदगड तालुक्यात सर्वाधिक 31.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हातकणंगले तालुक्यात 1.6 मिमी पाऊस झाला असून शिरोळ 3.2, पन्हाळा 0.7, शाहूवाडी 10.7, राधानगरी 2.2, गगनबावडा 1.9, करवीर 0.0, कागल 0.0, गडहिंग्लज 4.2, भुदरगड 13.2, आजरा 11.7 मि.मी पावसाची नेंद झाली आहे.
सहा बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 500 क्युसेक विसर्ग सुरु असून 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ व दूधगंगा नदीवरील दत्तवाड व वारणा नदीवरील तांदूळवाडी असे एकूण 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरणातील पाणीसाठा (दलघमीमध्ये)
राधानगरी 231.51 दलघमी पाणीसाठा असून तुळशी 98.01, वारणा 972.83, दूधगंगा 628.87, कासारी 75.95, कडवी 71.24, कुंभी 76.43, पाटगाव 104.97, चिकोत्रा 43.12, चित्री 53.41, घटप्रभा 43.09, आंबेआहोळ 30.98, जंगमहट्टी, जांबरे, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









