राधानगरी/ महेश तिरवडे
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व अभयारण्य परिसरात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरण 50 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 55 मी. मी इतका पाऊस नोंदला असून, आजतागायत 1099 मी. मी पाऊस नोंदवला आहे. सध्या पाणी पातळी 319.28 फूट व पाणीसाठा 4109.14 द ल घ फूट(4.10 टी एम सी)असून, सध्या विसर्ग ही बंद करण्यात आला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी 5.65 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.
गेल्या वर्षी राधानगरी धरण 10 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. मात्र, यावर्षी पावसाचा जोर कमी असल्याने उशिरा धरण भरण्याची शक्यता आहे. असाच पावसाचा जोर राहिल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरण भरण्याची शक्यता आहे.









