पन्हाळा, प्रतिनिधी
Kolhapur Panhala News : ज्याप्रमाणे पन्हाळगडाला इतिहासाचा वारसा लाभला आहे. त्याचप्रमाणे गडाच्या पायथ्याशी व तालुक्यातील बहुतांशी गावांना देखील ऐतिहासिक महत्त्व आहे.मात्र तालुक्यातील नेबापुर,मंगळवारपेठ,आपटी, जाधववाडी,नावली पैकी धारवाडी, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, म्हाळुंगे, बादेवाडी, वैखंडवाडी, जेऊर, रविवारपेठ, धबधवेवाडी, राक्षी, निकमवाडी, सोमवारपेठ, इंजोळे, बांदिवडे, खडेखोळ, मराठवाडी, बोंगेवाडी या पन्हाळाच्या आसपासच्या गावासह पश्चिम भागातील हरपवडे, आंबर्डे, वेतवडे, पणोरे, पणुत्रे, वाघवे, पोहाळवाडी आदी गावात भुस्खलनाची मालिका गेल्या काही वर्षापासुन सुरु झाली आहे.
पन्हाळा तालुक्यात या घटना घडत असल्यामुळे ही गंभीर बाब आहे.पावसाने आणखी जोर धरल्यास भुस्खलनामुळे होण्राया नुकसानीला जबाबदीर कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.तरी वरील सर्व गावातील नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.भुस्खलनामुळे आज अनेक कुटुंबे बेघर बनली आहेत.
पन्हाळगडाच्या पायथ्याशी असण्राया नावली पैकी धारवाडी येथील डोंगराला भुस्खलनामुळे भेगा पडल्या आहेत.तर गावातील काही इमारतींना देखील तडे गेले आहेत.त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणुन येथील 45 तर यागावाच्या जवळ असण्राया जाधववाडी येथील तीन अशा 48 कुटुंबाचे नावली येथील प्राथमिक शाळेत व समाजमंदिरात स्थांलतर केले आहे.त्यामुळे पन्हाळ्यासह बांधारी परिसरातील अनेक गावांवर भुस्खलनाची टांगती तलावर उभी राहिली आहे.
10 आँगस्ट 2006 साली आपटी गावातील गौतम कांबळे,वसंत बापु कांबळे,मारुती बापु कांबळे आणि विजय कुरणे यांची घरे भुस्खसनात नामशेष झाली होती.या बेघर कुटुंबांना शासनाकडुन 17 वर्षे होवुन देखील कोणतिच मदत मिळालेली नाही.जांभळेवाडी ?sथील अडीच एकर डोंगराचा भाग खचला होता.यामध्ये पन्नास गुंठ्याहुन अधिक शेती,सत्तर झाडे जमिनीत गाडली गेली.भुस्खलनाच्या घटनांवर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्यात नुकतेच आपटी ते नावली रस्त्यावरील धारवाडी येथे डोंगराला भेगा पडल्याची घटना जाती आहे.त्यामुळे आपटी-नावली मार्ग बंद होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
2016 मध्ये पन्हाळगडाच्या पश्चिमेस असण्राया तीन दरवाजाच्या खालील बाजुस रविवार पेठ,इंजोळे,न्यु सोमवारपेठ,गुढे तसेच कोतोली कडे जाणारा रस्ता पावसामुळे जागोजागी खचला होता.तसेच वाघवे पैकी उदाळेवाडी येथील शेतजमिनीचे भुस्खलन झाल्याचे समोर आले आहे.
2017 मध्ये गडाच्या पायथ्याशी असण्राया बुधवारपेठ, नेबापुर, गुरुवारपेठ येथे मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले होते. यामध्ये गुरुवारपेठ येथील न्यु कन्या हायस्कुलची इमारत पुर्णपणे जमिनदोस्त झाली होती.तर गुरुवारपेठ येथील अनेकांच्या घरांना तडे गेले होते.यावेळी मेहबुब काझी यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्यांना बेघर होण्याची वेळ आली तरी अजुन शासनाकडुन कोणतिच मदत करण्यात आली नसल्याचे काझी यांनी सांगितले .पन्हाळ्याच्या पश्चिमेस मसाईपठार,म्हाळुंगेकडे जाणारा रस्ता खचुन चार-पाच वर्षे होत आली तरी तात्पुरती मलमपट्टी करण्यापलिकडे काहीच हालचाल दिसुन येत नाही.
दरम्यान 2019 व 2021साली अतिमुसळधार पावसाने पन्हाळगडाचा मुख्य मार्ग दोनवेळा खचण्याची घटना घडली.तर रस्त्याच्या जवळील चार दरवाजा येथील तटबंदीची गतवर्षी पडझड होवुन दरीच्या बाजुने जमिन सरकु लागली आहे.त्याच बरोबर 2021साली पणुत्रे,आंबर्डे,हरपवडे,वेतवडे,पणोरे या गावांना भुस्खलनाचा मोठा फटका बसला होता.या भागात भुस्खलनामुळे शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले असुन कोणाचे शेत कोठे आहे हे ओळखणे मुश्कील बनले होते.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने शेतजमिनीची शासकीय मोजणीचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश आमदार पी.एन.पाटील यांनी दिले होते.
इंजोळे ते धनगवाडा पर्यंत मसाई पठाराचा डोंगरला देखील भुस्खलनाचा फटका बसत असुन जमिन खाली-खाली सरकु लागल्याचे समोर आले आहे.एकुणच इर्शाळवाडीची दुर्घटना ताजी असताना त्यात पन्हाळा तालुक्यातील धारवाडीच्या डोंगराला भेगा पडल्याने व इमारतीना तडे गेल्याने नागरिकांच्यांत घबराहटीचे वातावरण पसरले आहे.भविष्यात भुस्खलनाच्या घटना घडु नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणीसह भुस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.
चौकट:-पन्हाळा तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पाऊस त्यात नावली पैकी धारवाडी येथे डोंगराला पडलेल्या भेगा व इमारतींना गेलेले तडे यामुळे या गावातील 45 तर यालाच लागुन असलेल्या आपटीपैकी जाधववाडी येथील तीन कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणुन प्रशासनाने स्थलांतर केले आहे.तसेच संभाव्य भुस्खल व दरडप्रणवग्रस्त गावांतील नागरिकांना स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या असल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
भुस्खलनाची कारणे :
पन्हाळगडाच्या सभोवताली व तालुक्यातील बहुतांशी भागतील जमीन तांबडी,भुसभुशीत आहे.त्यात दगड नाहीत.त्यामुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडला की जमिन पाण्याच्या प्रवाहाबरोबरच सरकते.या जमिनीत असणारे नैसर्गिक अडथळे काढले गेले की पाण्याचा प्रवाह बदलतो आणि या प्रवाहाबरोबरच जमिनीवरील घरे, झाडे, दगड उताराच्या बाजुने सरकतात. जागोजागी मानवी हस्तक्षेपामुळे जमिनीचे सापटीकरण करण्याचे प्रमाण वाढल्याने झाडे मुळापासुन काढल्याने देखील भुस्खलनाचा धोका वाढत आहे.









