Kolhapur Rain Update: जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सकाळी ११ पासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत सहा फुटांची वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूःस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









