कसबा बीड /प्रतिनिधी
Kolhapur Rain Update : धुव्वाधार संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.करवीर तालुक्यातील महे-कसबा बीड दरम्यान असणाऱ्या पुलावर पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.सर्व वाहनधारकाने आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करू नये असे महे व कसबा बीड ग्रामपंचायत यांचेकडून सूचना दिल्या आहेत.
हा मार्ग बंद झाल्याने कसबा बीड,सावरवाडी,शिरोली दुमाला,चाफोडी आदी भागातील सर्व वाहनधारक व नागरिकांनी बालिंगा मार्गे कुडित्रे ,सांगरूळ,बहिरेश्वर मार्गे प्रवास करावा.किंवा महे मार्गे हळदी व्हाया बाचणी या मार्गे इच्छित स्थळी जाण्याची गरज आहे.तसेच पाणी आलेल्या कोगे-कुडित्रे, व महे-कसबा बीड या दोन्ही ठिकाणी करवीर पोलीस प्रशासक, पोलिस पाटील, कोतवाल आदी सर्वानी काटेकोर नियोजन केले आहे.