Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात गेली 4 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या ओसांडून वाहत आहेत. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले असून पंचगंगा नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाराऱ्याची पाणी पातळी आज सकाळी 10 वाजता 40 फूट 02 इंच इतकी आहे.तर पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट इतकी आहे.केर्ली येथे पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद करण्य़ात आला आहे. प्रशासनांकडून नदीकाटावरील गावांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.
आज दिवसभरात पावसाचा जोर कमी राहिला तरीही पाणी वाढत असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. काल दिवसभरात सुमारे 50 वर कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. एकाच महिन्यात सलग दुसऱ्यावेळी ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागत आहे.
दुसरीकडे चित्रदुर्ग मठ या ठिकाणी सहाय्यक अभियंता सुरवसे यांनी पाहणी केली असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गळती नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी आज पाहणी केलेली आहे. एका ठिकाणी छोटी गळती आहे. ती काढून घेण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत असे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची,चहा,नाश्ता,जेवण,लाईट ,आरोग्य तपासणी,स्वच्छता व इतर व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. तरी ज्या परिसरात पूरस्थिती उध्दभवली आहे तेथिल नागरीकांनी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
Previous Articleमहापालिका कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त
Next Article पालकमंत्र्यांनी घेतला पुरा संदर्भात आढावा









